होम City News परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्याची तात्काळ सोय करावी – खासदार जलील

परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्याची तात्काळ सोय करावी – खासदार जलील

परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्याची तात्काळ सोय करावी – खासदार जलील


औरंगाबाद : {अशफाक शेख)

किर्गिस्तान, रशिया व हंगरी येथील विविध विद्यापीठात वैद्यकीय व इतर शिक्षण घेणारे औरंगाबादसह राज्यभरातील अनेक विद्यार्थी अडकलेले आहे. विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्याची तात्काळ सोय करुन त्यासाठी विमान उतरण्यासंदर्भात आवश्यक सर्व परवानगी संबंधित विभागाला देण्यात यावी अशी मागणी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी परराष्ट्रमंत्री, नागरी उड्डाण मंत्री तसेच किर्गिस्तान, रशिया व हंगरी येथील भारतीय राजदूत यांच्या कडे केली आहे.


कोविड १९ मुळे जगभरातुन इतरत्र प्रवास करण्यास बंदी झालेली असल्यामुळे विशेष तरतुदी शिवाय कोणीही मायदेशी परतु शकणार नव्हते याबाबत अनेक नागरीकांनी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी आमची मुले परत आणण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी भावनिक साद खासदार इम्तियाज जलील यांना घातल्यामुळे त्यांनी यावर तात्काळ सकारात्मक पावले उचलुन भारत सरकारच्या परराष्ट्रमंत्री, नागरी उड्डाण मंत्री यांना सदर अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याबाबतची विनंती करुन खासदार इम्तियाज जलील यांनी किर्गिस्तान, रशिया व हंगरी येथील राजदूतांना लेखी मागणी केल्यावरुन विद्यार्थ्यांना परत आणण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.


परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांकडे आता पैसे हि संपलेले असल्याने तेथे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व प्रशासनिक पूर्तता करुन सर्व कागदपत्रांसह नावांची यादी संबंधित देशातील भारतीय दूतावासात पाठविण्यात आली असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.


अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यासाठी शासनास्तरावर योग्य त्या हालचाली सुरु झाले असुन औरंगाबाद जिल्ह्यातील व राज्यातील इतर कोणी विद्यार्थी याच किंवा अशाच कारणामुळे परदेशात अडकले असल्यास त्यांच्या पालकांनी तात्काळ खासदार कार्यालयाशी पुढील कारवाई साठी सपंर्क साधावे असे आवाहन खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी केले आहे.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें

Must Read

बचा पोश एक जटिल प्रथा जो सैकड़ो सालों से अफगानिस्तान में चली आ रही है

बचा पोश यह शब्द सुनकर आप को लग रहा होगा की यह क्या है ?बचापोश एक ऐसे जटिल प्रथा है जो सेकड़ो...

ONLINE लोन लेने वाले हो जाए सावधान

अगर आप online और आसान लोन लेने की तैयारी मे है तो अब आप सावधान हो जाये, क्युकी मुंबई क्राइम ब्रांच ने...

धारावी के पुनर्विकास को मिलेगी गती – राहुल शेवाले

धारावी पुनर्विकास को मिलेगी गति एक महीने में रेल्वे की जगह का हस्तांतरण किया जाएगा सांसद...

मुंबई के छत्रपति शिवाजी महाराज इंटरनेशनल एयरपोर्ट पर कस्टम विभाग की एयर इंटेलिजेंस यूनिट(AIU)ने विदेशी महिला ड्रग्स पेडलर को गिरफ्तार किया

मुंबई के छत्रपति शिवाजी महाराज इंटरनेशनल एयरपोर्ट पर कस्टम विभाग की एयर इंटेलिजेंस यूनिट(AIU)ने विदेशी महिला ड्रग्स पेडलर को गिरफ्तार किया

चूहे के लिये जहर लगा के रखा टमाटर महिला ने खाया,महिला की मौत

चूहे के लिये जहर लगा के रखा टमाटर महिला ने खाया,महिला की मौत मुंबई के मलाड इलाके में लापरवाही...