होम City News वाऱ्यावर परप्रांतीय…….आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलंय…. परप्रांतीयांचा टाहो …. यूपी- बिहारींनी काढला...

वाऱ्यावर परप्रांतीय…….आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलंय…. परप्रांतीयांचा टाहो …. यूपी- बिहारींनी काढला आपल्या मुख्यमंत्र्यांवर राग, निवडणुकीत त्यांना ताकद दाखवू

वाऱ्यावर परप्रांतीय…….आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलंय…. परप्रांतीयांचा टाहो …. यूपी- बिहारींनी काढला आपल्या मुख्यमंत्र्यांवर राग, निवडणुकीत त्यांना ताकद दाखवू

औरंगाबाद – अशफाक शेख

औरंगाबाद:- एका महामारीचा विषाणू किती मोठं संकट आणू शकतो हे प्रत्यक्ष बघतांना अंगावर शहारे येण्यास वेळ लागत नाही. पुणे, मुंबई, ठाणे ,भिवंडी व नाशकाहून येणाऱ्या प्रत्येक कामगार मजुरांची कथा वेगळीच आहे. या लोकांना औरंगाबाद एक आशेचे किरण वाटत आहे. औरंगाबाद हुन कसं तरी आपल्या गावी जाऊ म्हणून परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे औरंगाबाद कडे येत आहे. त्यांच्याशी बातचीत करतांना ते महाराष्ट्र शासन व लोकांचे आभार मानतात. दुसरी कडे आपल्या यूपी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना धडा शिकवण्याची धमकी ही देत आहे.त्याला कारण आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलंय…. — गेल्या आठ दिवसापासून परप्रांतीय मजूर आपल्या गावी परत जाण्यासाठी पायी निघालेत. अनेक मजुरा बरोबर त्यांचे कुटुंबीय आहेत. टाळेबंदी मुळे व्यवसाय, कारखाने बंद झाले . दोन महिने जे पैसा होता तो खर्च झाला. मात्र भाड्याचे घर व खाण्या पिण्यास पैसा उरला नाही. अश्या सैर परिस्थितीत अखेर या असह्य मजुरांनी आपल्या घराची वाट धरली. हे मजूर जेव्हा कामाच्या ठिकाणाहून निघाले तेव्हा वाट किती बिकट असेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. चार पाच दिवस पायी चालून थकवा आलाय, पोटात अन्न नसल्याने थकवा आलाय. आता जगणार की मरणार हे समजायला मार्ग नाही तरी अनेकांनी जिद्द सोडलेली नाही. औरंगाबादहुन रेल्वे बसेस सोडल्या जात असल्याने या मजुरांचा आत्मविश्वास वाढलाय.आलेल्या राज्याच्या राज्यकर्त्यांनी त्यांची सूद न घेतल्याने अनेकजण नाराजी व्यक्त करतायेत. औरंगाबादेत अडकलेल्या परप्रांतीयात यूपी, बिहार व मध्यप्रदेश येथील नागरिकांचा भरणा जास्त आहे. रेल्वे स्टेशनच्या कासलीवाल मैदानावर काही भागलपूर बिहारच्या मजुरांशी बातचीत केली असता मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आमची काळजी घेतली नाही. त्यांच्या पेक्षा महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी व सेवाभावी संस्थेच्या सेवकांनी आम्हाला मदत केली. अजूनही हजारो लोक अडकलेले आहे. त्यांना वेळीच मदत न केल्यास त्यांना बिहारात पोहोचून धडा शिकवू असा दम दिला. भागलपूर जिल्ह्यतील बेलसारिया गावाचे हे रहिवासी.तब्बल दीड दोनशे लोक सहकुटुंबिया पुणे रांजणगाव येथे मजुरीस होते. तीन दिवस पायी चालून त्यांनी औरंगाबाद गाठले. –दरम्यान यूपीच्या काही युवकांशी बातचीत केली असता ते कसं तरी ठाण्याहून औरंगाबादला पोहोचले. एका कारखान्यात काम करणारे हे युवक हवालदिल झाले आहे. येतांना ट्रक व इतर गाडीवाल्यांना जास्त पैसे मोजून आलोय. आता पैसे नाहीत.आम्हला आमच्या गावी पोहोचवा अशी विनंती करत होते. या वेळी उत्तर प्रदेश शासनाच्या मदती विषयी त्यांनी आशा सोडून दिली. महिन्याभरापासून आम्ही वापस बोलवा म्हणून विनंती करतोय मात्र मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले. आम्ही यूपीला पोहोचून जाब विचारू. असे ते रागाने सांगत होते. पैठण रोडवरील महानुभाव आश्रम, ते रेल्वे स्टेशन पर्यंत अनेक कुटुंबीय आवल्या गावी लवकरात लवकर पोहकचण्यासाठी धडपडत आहेत. —–बॉक्स — नीतीश की सबक सिखाएंगे ……………. आम्ही मुळचे बेलसारिया जिल्हा भागलपूर बिहार राज्यातील आहोत. वर्षभरापासून पुण्याच्या एम आयडीसी परिसरात मोलमजुरी कधी कारखान्यात काम करून उपजीविका भागवत होतो. टाळेबंदी मुळे कारखाने बंद आहेत. दीड महिना सबुर केला. हाताला काम नसल्याने पैसा ही नाही. लोकांनी मदत केली. बरोबर मुला बाळांचा सांभाळ शक्य होत नव्हता . शेवटी गावा कडे जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री मुख्यमंत्री नितीश कुमार मदत करतील म्हणून आहाहा होती. मात्र त्यांनी कोणतीच मदत पोहोचविली नाही. अब तो बिहार जाकर ही सबख सिखाएंगे…. — नरेंद्र पासवान…परप्रांतीय .————बॉक्स– आम्ही गरीब असल्याने दुर्लक्षित आहोत.कोरोना आजार आमच्या मुळे आलेला नाही , शेवटी आमच्या मुख्यमंत्र्यांना माणुसकी आहे की नाही हेच कळत नाही. आम्ही महाराष्ट्रात अर्धा रस्ता मुळा बाळांना घेऊन पायी कापला. लहाण मुलांना लोकांनी दूध बिस्किटे दिली. अनेक ठिकाणी थांबवून जेवण पाणी देण्यात आले. आम्हाला मदत मिळाली नसती तर आम्ही रस्त्यातच मेलो असतो. रासफयात मरणा पेक्ष्या गावी जाऊन मेलोले बरं… औरंगाबाद रेल्वे जाणार आल्याने इथेच थांबलो. गावी कधी जाणार माहीत नाही. आमच्यावर उपकार करा आमची व्यवस्था करा. — पार्वती सुलारी … परप्रांतीय महिला

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें

Must Read

देवेंद्र फड़णवीस का बंगला वाशिंग मशीन का काम कर रही है – बाला साहेब थोरात

कांग्रेस नेता बाला साहेब थोरात ने रश्मि शुक्ला और मोहित कंबोज की देवेंद्र फडणवीस से मुलाकात पर कहा की देवेंद्र फडणवीस का...

दही हंडी को लेकर सरकार अपनी योजना बताए – सुनील प्रभु

शिवसेना विधायक सुनील प्रभु ने शिंदे सरकार को घेरने का प्रयास किया उंन्होने दही हंडी के आयोजन को लेकर सरकार की घोषणा...

पूरी दुनिया बीजेपी जितना चाहती है – नाना पटोले

कांग्रेस नेता और महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने विधानसभा मानसून सत्र के दूसरे दिन बीजेपी पर निशाना साधते हुए कई एहम...

खड्ढे के कारण नेशनल पार्क ब्रिज पर एक्सीडेंट 2 की मौत

खड्ढे के कारण नेशनल पार्क ब्रिज पर एक्सीडेंट 2 की मौत वेस्टर्न एक्सप्रेस हाइवे नेशनल पार्क ब्रिज पर खड्ढे...

बचा पोश एक जटिल प्रथा जो सैकड़ो सालों से अफगानिस्तान में चली आ रही है

बचा पोश यह शब्द सुनकर आप को लग रहा होगा की यह क्या है ?बचापोश एक ऐसे जटिल प्रथा है जो सेकड़ो...